हरिश्चंद्रगडावर थर्टी फस्टला नो एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:16 IST2020-12-26T04:16:47+5:302020-12-26T04:16:47+5:30
३१ डिसेंबरला बाय बाय करताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण हरिश्चंद्रगड व रतनगड गाठतात. अनेक जण मोठ्या ...

हरिश्चंद्रगडावर थर्टी फस्टला नो एन्ट्री
३१ डिसेंबरला बाय बाय करताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जण हरिश्चंद्रगड व रतनगड गाठतात. अनेक जण मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. रात्रभर या ठिकाणी धिंगाणा घालतात. यामुळे येथील पर्यावरणाला हानी पोहोचते. गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन मागील तीन वर्षांपासून हरिश्चंद्रगड आणि रतनगड व इतर गडकिल्ल्यांवर वन्यजीव विभागाने वर्षअखेर साजरी करण्यासाठी पर्यटकांना बंदी घातली आहे. हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचनई येथील ग्रामस्तरीय विकास समितीने गड परिसरातच पर्यटकांना ३१ डिसेंबरला येण्यास बंदी घातली आहे. ही बंदी मोडून कोणी हद्दीत प्रवेश केल्यास त्या पर्यटकांकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार असल्याचाही फलक या समितीमार्फत येथे लावण्यात आला आहे, तर रतनगडावर यावर्षी पर्यटकांना जाता येणार नसल्याचे भंडारदरा अभयारण्य विभागाने जाहीर केले आहे.
..........
३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी अभयारण्य विभागातील गडकिल्ल्यांवर पर्यटक गर्दी करतात. रात्रभर येथे पार्ट्याही रंगत असतात. यात मद्यपान करणाऱ्यांची संख्या मोठी असते. यातून येथील पर्यावरणाला व गडकिल्ल्यांच्या वैभवालाही हानी पोहोचते. तीन वर्षांपासून शासनाने थर्टी फस्टला गडकिल्ल्यांवर पर्यटकांना बंदी घातली असून, ती यावर्षीही कायम ठेवण्यात आली आहे.
-डी.डी. पडवळे, अमोल आडे, वनक्षेत्रपाल, हरिश्चंद्रगड, भंडारदरा.