शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नगरमधून उमेदवारी करण्याची ईच्छा नाही; पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केली भूमिका

By अरुण वाघमोडे | Updated: June 16, 2024 18:18 IST

छत्रपती संभाजीनगर येथून आष्टीकडे जात असताना भाजपा कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे नगर शहरात स्वागत करण्यात आले.

अरुण वाघमोडे. अहमदनगर: मी अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी भाजपाचे येथील शहर जिल्हाध्यक्षांनी केली आहे. त्यांचे मी आभार मानते मात्र, यावर माझे कोणतेही मत नसून तशी माझी ईच्छा नाही. अशी भूमिका भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केली.मुंडे या रविवारी छत्रपती संभाजीनगर येथून आष्टीकडे जात असताना भाजपा कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे नगर शहरात स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार शिवाजी कर्डिले, सुखदेव पवार,सोनू भुजबळ, अमोल सुरसे, भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष दीपक दहिफळे, नितीन शेलार, कैलास गर्जे, बंटी ढापसे, सरपंच अमित आव्हाड, सार्थक आंधळे, सरपंच बापू आव्हाड, वैभव झोटिंग अतुल गीते, सतीश ढाकणे, संकेत डोळे, सतीश घोडके, किशोर बडे, सौरभ सानप, विजय भालेकर, ज्ञानेश्वर आव्हाड,सुजल आंधळे, रविराज आव्हाड, युवराज शिरसाठ आदी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीनंतर मुंडे या प्रथमच शहरात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत आपला पराभाव झाला असला तरी तुम्हीच आमच्या नेत्या आहात. अशी भावना याप्रसंगी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी मुंडे म्हणाल्या पराभवाने खचून जाऊ नका. कार्यकर्त्यांनी भावनाविवश होऊन कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडे