विकासकामांच्या गुणवत्तेबाबत चालढकल नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:22 IST2021-09-19T04:22:14+5:302021-09-19T04:22:14+5:30
नेवासा : गावागावांतील गटतट बाजूला ठेवून विकासकामांवर भर देऊ. त्यासाठी आपआपसांतील गैरसमज दूर करू. मीही समन्वयासाठी प्रयत्नशील राहीन. विकासकामे ...

विकासकामांच्या गुणवत्तेबाबत चालढकल नको
नेवासा : गावागावांतील गटतट बाजूला ठेवून विकासकामांवर भर देऊ. त्यासाठी आपआपसांतील गैरसमज दूर करू. मीही समन्वयासाठी प्रयत्नशील राहीन. विकासकामे करताना गुणवत्तापूर्णच व्हायला हवीत. विकासकामांच्या गुणवत्तेच्या बाबतीत चालढकल सहन करणार नाही, असे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले.
तेलकुडगाव (ता. नेवासा) मंत्री गडाख यांच्या प्रयत्नाने मंजूर तेलकुडगाव ते निंबेनांदूर रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण कामाचे भूमिपूजन व सार्वजनिक व्यायामशाळेचे लोकार्पण शनिवारी सकाळी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
गडाख म्हणाले, मंत्रिपदाच्या माध्यमातून नेवासा तालुक्यातील गावागावांत विकासकामे करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. विविध गावांत तरुणांच्या आरोग्यासाठी आवश्यक म्हणून व्यायामशाळा दिलेल्या आहेत.
अध्यक्षस्थानी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक साहेबराव घाडगे होते. याप्रसंगी पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, जिल्हा परिषद सदस्य अनिल अडसुरे, पंचायत समिती सदस्य दादासाहेब एडके, सुरेश काळे, गोरक्षनाथ घोडेचोर, नामदेव घोडेचोर, भारत काळे, सरपंच रमेश काळे, उपसरपंच गोवर्धन काळे, शरद काळे, सतीश काळे, ज्ञानेश्वर काळे, मालोजी गटकळ, गोकुळ भताने, बबनराव पिसोटे, लक्ष्मण पांढरे, अण्णा केदार, रमेश कराळे, एकनाथ भुजबळ, संतोष म्हस्के, मकरंद राजहंस, अरविंद घाडगे, शिवाजी घोडेचोर, भागचंद काळे, रमेश काळे, बाळासाहेब काळे, सोपान घोडेचोर, संभाजी म्हस्के, भानुदास गटकळ, श्रीकृष्ण घाडगे, मुरलीधर काळे, अशोक शेटे, पोपट सरोदे, संतराम काळे, तात्यासाहेब गायकवाड, जनार्दन गटकळ, बापूसाहेब साळवे, भागचंद साळवे, आदी उपस्थित होते.
शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र म्हस्के यांनी प्रास्ताविक केले. दीपक काळे यांनी सूत्रसंचालन केले. भारत काळे यांनी आभार मानले.
----
१८ नेवासा गडाख
तेलकुडगाव येथे रस्ता कामाचे भूमिपूजन करताना मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व इतर.