निळवंडेचे काम मीच मार्गी लावणार : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 17:03 IST2019-06-01T17:00:34+5:302019-06-01T17:03:22+5:30
अहमदनगरमधील निळवंडे धरणाचे काम मीच पूर्ण करणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

निळवंडेचे काम मीच मार्गी लावणार : नितीन गडकरी
अहमदनगर : अहमदनगरमधील निळवंडे धरणाचे काम मीच पूर्ण करणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गडकरी यांचे दिल्लीवरून नागपूर येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यावेळी त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील पाणीपुरवठ्या विशेष काम करणार असल्याचीही ग्वाही त्यांनी दिली.
गडकरी म्हणाले, नदी आणि नाल्यांचे खोलीकरण केले जाणार आहे. त्यामुळे यावेळी पावसाळ््यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. विशेषत तलाव, बंधावे बाधण्याचे मोठे काम केले जाईल. दुष्काळी भागात पाणी अडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले जाईल. अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडेच्या कामाचा शब्द दिला आहे. निळवंडेच्या कामाची प्रोसेस सुरु केली असून निधी तात्काळ उपलब्ध होण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार असल्याचे केंद्रिय रस्ते आणि बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.