निर्मल’चे संचालक रमेश बाफना यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 21:14 IST2024-02-01T21:13:55+5:302024-02-01T21:14:19+5:30
अहमदनगर : येथील निर्मल अॅडव्हर्टायझिंगचे संचालक रमेशचंद्र नेनसुख बाफना (वय ७६) यांचे गुरुवारी (दि. १) अल्पशा आजाराने निधन झाले. ...

निर्मल’चे संचालक रमेश बाफना यांचे निधन
अहमदनगर: येथील निर्मल अॅडव्हर्टायझिंगचे संचालक रमेशचंद्र नेनसुख बाफना (वय ७६) यांचे गुरुवारी (दि. १) अल्पशा आजाराने निधन झाले. गेली ५२ वर्षांपासून अहमदनगरमध्ये ते जाहिरात व्यवसायात कार्यरत होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. निर्मल क्रिएशनचे संतोष बाफना यांचे ते वडील होत.
रोटरी क्लब, महावीर इन्टरनेशनल, आनंद जेष्ठ नागरिक संघ, अहमदनगर हास्य क्लब, अहमदनगर रेल्वे सल्लागार समिती, जैन कॉफरन्स अशा विविध संस्था-संघटनांवर त्यांनी काम केले. या संस्थांमध्ये त्यांनी मानाची पदं भूषवली. त्यांना समाजकार्याची आवड होती. तसेच त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या निधनाने जाहिरात, माध्यमसह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्यावर शुक्रवारी (दि. २) सकाळी ११.३० वाजता अहमदनगर येथील नालेगांव येथील अमरधाम स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.