नऊ वर्षांचा जलतरणपटू देणार डॉ. आंबेडकरांना अनोखी मानवंदना; अटल सेतूपासून सागरात पोहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 20:47 IST2025-04-10T20:45:29+5:302025-04-10T20:47:09+5:30

१५ किमीचे अंतर करणार पार

nine year old swimmer to pay unique tribute to dr ambedkar | नऊ वर्षांचा जलतरणपटू देणार डॉ. आंबेडकरांना अनोखी मानवंदना; अटल सेतूपासून सागरात पोहणार

नऊ वर्षांचा जलतरणपटू देणार डॉ. आंबेडकरांना अनोखी मानवंदना; अटल सेतूपासून सागरात पोहणार

लोकमत न्यूज नेटवर्क, अकोले (जि. अहिल्यानगर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त एका नऊ वर्षांच्या चिमुकल्या जलतरणपटूने अनोखी मानवंदना देण्याचा संकल्प केला आहे. विक्रोळीतील मंथन मुरलीधर बांडे (मूळगाव खडकी खुर्द, ता. अकोले) हा बाल जलतरणपटू अटल सेतू ते गेट वे ऑफ इंडिया हे सुमारे १२ ते १५ किलोमीटरच्या सागरी अंतरात पोहण्याचा धाडसी उपक्रम राबवणार आहे.

मंथन सध्या एमपीएस हरियाली व्हिलेज सीबीएसई स्कूल, विक्रोळी येथे पाचवीत शिकत आहे. त्याला जलतरणाची विशेष आवड आहे. वयाच्या सातव्या वर्षांपासून त्याने जलतरणात पाय ठेवला. नवव्या वर्षी तो आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या तो मुंबई महानगरपालिकेच्या विक्रोळी जलतरण तलावात नियमित सराव करतो. प्रशिक्षक सतीश निंबाळकर यांचे मार्गदर्शन लाभते आहे. या जलतरण मोहिमेस महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेने अधिकृत मान्यता दिली आहे. एवढ्या कमी वयात एवढा प्रदीर्घ सागरी जलतरणाचा अनुभव ही मंथनची खासियत ठरते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत मंथनने जलतरणाच्या माध्यमातून एक अनोखी मानवंदना देण्याचे ठरवले आहे. हे केवळ एक सागरी आव्हान नाही, तर त्यामागे असलेली भावना ही त्यांच्या विचारांची उजळणी करणारी आहे.

बौद्ध पंच ट्रस्टच्या वतीने पत्रकार परिषद झाली. त्यात ही माहिती देण्यात आली. यावेळी रवी रूपवते, मिलिंद रूपवते, लक्ष्मण आव्हाड, प्रा. प्रकाश जगताप, सुधीर रूपवते, अनंत रूपवते, गोकुळ माघाडे, राजू वाघमारे, ओंकार रूपवते, कमलेश तायडे, किरण पवार, अक्षय रूपवते, बाळासाहेब जाधव उपस्थित होते.

Web Title: nine year old swimmer to pay unique tribute to dr ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.