कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात श्रीरामपूरमधील नऊ जण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 16:06 IST2020-04-13T16:05:10+5:302020-04-13T16:06:13+5:30

श्रीरामपूर : नेवासा येथे सोमवारी एक कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आला. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या श्रीरामपूर शहरातील नऊ जणांना नगर येथील सिव्हिल रुग्णालयात दुपारी हलविण्यात आले. संबंधित कोरोनाग्रस्त रुग्णाची तपासणी करणारे दोन जण हे वैद्यकीय क्षेत्रातील असल्याने श्रीरामपूरमध्ये एकच धास्ती निर्माण झाली आहे.

 Nine people from Shrirampur were dispatched to the city for investigation after contacting a coronado patient | कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात श्रीरामपूरमधील नऊ जण

कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात श्रीरामपूरमधील नऊ जण

श्रीरामपूर : नेवासा येथे सोमवारी एक कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आला. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या श्रीरामपूर शहरातील नऊ जणांना नगर येथील सिव्हिल रुग्णालयात दुपारी हलविण्यात आले. संबंधित कोरोनाग्रस्त रुग्णाची तपासणी करणारे दोन जण हे वैद्यकीय क्षेत्रातील असल्याने श्रीरामपूरमध्ये एकच धास्ती निर्माण झाली आहे.
नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नगर शहरानंतर जिल्ह्यातील नेवासे, संगमनेर, राहता, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यात रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यात ग्रामीण भागातही एका रुग्णाचा कोरोनाच्या संसगार्मुळे पुणे येथील ससून रुग्णालयात मृत्यू झाला होता.
नेवासे येथे सोमवारी एक रुग्ण मिळून आला. सोमवारी त्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला. मात्र या रुग्णाचा श्रीरामपूर येथील नऊ जणांशी संपर्क झाल्याची माहिती आहे. खोकला आल्यामुळे या रुग्णाने शुक्रवार व शनिवार या दोन दिवशी श्रीरामपूर येथे दोन वैद्यकीत तज्ज्ञांकडून तपासणी करून घेतल्याची माहिती आहे. त्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या त्या दोघांसह नऊ जणांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.

Web Title:  Nine people from Shrirampur were dispatched to the city for investigation after contacting a coronado patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.