आगीत नऊ शेळ्यांचा होरपळून मृत्यू
By Admin | Updated: March 27, 2016 23:38 IST2016-03-27T23:34:39+5:302016-03-27T23:38:53+5:30
बारागाव नांदूर: राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे रविवारी दुपारी राहत्या घराला लागलेल्या आगीत नऊ शेळ्या मृत्युमुखी पडल्या़ आगीमध्ये सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले़

आगीत नऊ शेळ्यांचा होरपळून मृत्यू
बारागाव नांदूर: राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे रविवारी दुपारी राहत्या घराला लागलेल्या आगीत नऊ शेळ्या मृत्युमुखी पडल्या़ आगीमध्ये सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले़ आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मोमीन आखाडा येथील शेतकरी जमुद्दीन शेख व त्यांचा मुलगा बशीर यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली़ आग विझविण्याचा गावकऱ्यांनी प्रयत्न केला़ अरूंद रस्त्यामुळे अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचू शकले नाही़ शेख यांचे कुटुंबीय दुपारी शेतात गेले होते. तेव्हाच आग लागली. आगीत रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य खाक झाले़ माजी सभापती शिवाजी गाडे यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केले़ आग विझविण्यासाठी संजय शिंदे, गिताराम कातोरे, अलम शेख, नूरमहंमद शेख, असिफ शेख यांनी प्रयत्न केले़ कामगार तलाठी सोनवणे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला़ (वार्ताहर)