निंबळकला घरोघरी शिवरायांच्या शिल्पाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:41 IST2021-02-21T04:41:14+5:302021-02-21T04:41:14+5:30

प्रारंभी गावातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी ...

Nimbalakala Shivaraya's gift of Shilpa from house to house | निंबळकला घरोघरी शिवरायांच्या शिल्पाची भेट

निंबळकला घरोघरी शिवरायांच्या शिल्पाची भेट

प्रारंभी गावातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तू ऊर्फ राजू रोकडे यांनी स्व. भीमा गोविंद रोकडे यांच्या स्मरणार्थ गावात शिल्पवाटपाचा उपक्रम राबविला. यावेळी सरपंच प्रियंका लामखडे, उपसरपंच बाळासाहेब कोतकर, माजी सरपंच विलास लामखडे, ग्रामपंचायत सदस्या मालन रोकडे, नामदेव चांदणे, सचिन रोकडे, मच्छिंद्र म्हसे, चांद पटेल, भैया पटेल, उद्योजक अविनाश आळंदीकर, ग्रामविकास अधिकारी अनिल भाकरे, लेखक रामदास कोतकर, भगवान निमोणकर, ज्ञानेश्‍वर रोकडे, भाऊराव गायकवाड, मारुती गारुडकर, प्रमोद वाघमारे, आदी उपस्थित होते.

सरपंच प्रियंका लामखडे यांनी शिवाजी महाराजांचे शिल्प भेट देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली असल्याचे सांगून उपक्रमाचे कौतुक केले. राजू रोकडे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. सर्व जातिधर्मांच्या प्रजेला त्यांनी समान न्याय देण्याचे कार्य केले. शून्यातून विश्‍व निर्माण करणाऱ्या, परस्त्रीला मातेसमान मानणाऱ्या व अन्यायाविरोधात लढणाऱ्या शिवाजी महाराजांच्या कार्यातून सतत प्रेरणा मिळण्यासाठी त्यांच्या शिल्पांची भेट देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

--------फोटो - २०निंबळक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निंबळक येथे शिवाजी महाराजांचे शिल्प घरोघरी भेट देण्यात आले. यावेळी सरपंच प्रियंका लामखडे, उपसरपंच बाळासाहेब कोतकर, सामाजिक कार्यकर्ते राजू रोकडे, आदी उपस्थित होते.

Web Title: Nimbalakala Shivaraya's gift of Shilpa from house to house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.