हनुमान टाकळी देवस्थानला नीलेश लंके यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:16 IST2021-06-10T04:16:01+5:302021-06-10T04:16:01+5:30

तिसगाव : पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी सोमवारी दुपारी श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथे समर्थ हनुमान मूर्तीचे दर्शन घेतले. ...

Nilesh Lanka's visit to Hanuman Takli Devasthan | हनुमान टाकळी देवस्थानला नीलेश लंके यांची भेट

हनुमान टाकळी देवस्थानला नीलेश लंके यांची भेट

तिसगाव : पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी सोमवारी दुपारी श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथे समर्थ हनुमान मूर्तीचे दर्शन घेतले.

मंदिर परिसराची पौराणिक महती जाणून घेत तेथील विकासकामांचीही पाहणी त्यांनी केली. लंके दर्शनासाठी गावात आल्याचे समजताच तरुणाईची गर्दी झाली. अनेकांनी आमदारांसोबत सेल्फी घेत भेटीचे क्षण मोबाईलमध्ये चित्रित केले. देवस्थानचे अध्यक्ष रमेश महाराज यांनी कोविड रुग्णांच्या प्रती सुरू असलेल्या सेवेला प्रसंगी उजाळा दिला. आमदारांना धार्मिक ग्रंथ भेट देऊन सन्मान केला. पौराणिक मंदिरे, तेथील महती ही खरी समाजाची ऊर्जा आहे, असे ते म्हणाले. यावेळी शिवसेना नेते रफिक शेख, अभियंता शिवाजी भगत, सतीश घनवट, उद्योजक बाळाभाऊ ब्राम्हणे, अमोल दळवी, सचिन पठारे उपस्थित होते. चंद्रकांत गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. अमोल गवळी यांनी आभार मानले.

Web Title: Nilesh Lanka's visit to Hanuman Takli Devasthan