दिल्लीगेटला खानावळीत जुगार अड्डा : १६ जुगा-यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 20:45 IST2018-05-19T20:39:46+5:302018-05-19T20:45:58+5:30
दिल्ली गेट येथील डी.एड. कॉलेजजवळ असलेल्या खानावळीत सुरू असलेल्या जुगार अड्यावर तोफखाना पोलीसांनी छापा टाकून सोळा जुगा-यांना अटक केली.

दिल्लीगेटला खानावळीत जुगार अड्डा : १६ जुगा-यांना अटक
अहमदनगर: दिल्ली गेट येथील डी.एड. कॉलेजजवळ असलेल्या खानावळीत सुरू असलेल्या जुगार अड्यावर तोफखाना पोलीसांनी छापा टाकून सोळा जुगा-यांना अटक केली. यावेळी १ लाख ६३ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन राजकीय पदाधिकारी हा जुगार क्लब चालवित असल्याची चर्चा आहे.
पोलीसांनी छापा टाकून जुगार क्लबचा चालक सुनील शेंडगे, क्लबसाठी खोली देणारा दत्तात्रय बनकर, शेख आसलम, नितीन अशोक नवले, श्रीराम मुरलीधर न्याटी, संतोष सुदाम अमृत, नामदेव साून लंगोटे, रूपेश अशोक मुकुटे, अंबादास दत्तात्रय येनगुळ, संतोष प्रभाकर भागवत, दीपक सुधाकर वडगावकर, आतिष दिलीप टेकाडे, संजय आसाराम जाधव, भिमराज विश्वनाथ खताडे, अमरकांत पांडुरंग भापकर, श्रीराम विष्णू कोडम यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी जुराचे साहित्य, रोख रक्कम व चार मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ़अक्षय शिंदे यांना दिल्ली गेट येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. शिंदे यांच्यासह तोफखाना पोलीस ठाण्याचे निरिक्षक सुरेश सपकाळे, सहाय्यक निरिक्षक सणस, कॉस्टेबल दौंड, वाघमारे, दीपक रोहोकले, राम सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.