प्रियकराच्या मदतीने बायकोने केला नव-याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 20:48 IST2018-04-06T20:14:26+5:302018-04-06T20:48:57+5:30

अनैतिक संबधास विरोध केल्यानं श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे प्रियकराच्या मदतीने बायकोने केला नव-याचा खून केला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. विकास इंद्रभान पवार असे खून झालेल्या पतीने नाव आहे. खून केल्यानंतर पत्नी मनिषा पवार फरार झाली असून तिचा प्रियकर विशाल तोरणे शुक्रवारी सकाळी स्वत: तालुका पोलीस ठाण्यात हजर गुन्ह्याची कबुली दिली.

New wife murdered by wife | प्रियकराच्या मदतीने बायकोने केला नव-याचा खून

प्रियकराच्या मदतीने बायकोने केला नव-याचा खून

ठळक मुद्देप्रियकर पोलिसांत हजर बायको फरार

श्रीरामपूर : अनैतिक संबधास विरोध केल्यानं श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथे प्रियकराच्या मदतीने बायकोने केला नव-याचा खून केला. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. विकास इंद्रभान पवार असे खून झालेल्या पतीने नाव आहे. खून केल्यानंतर पत्नी मनिषा पवार फरार झाली असून तिचा प्रियकर विशाल तोरणे शुक्रवारी सकाळी स्वत: तालुका पोलीस ठाण्यात हजर गुन्ह्याची कबुली दिली.
यात्रोत्सवानिमित्त मयत विकास हा कुटुंबासमवेत पढेगाव येथे आला होता. तो मूळचा पढेगाव येथील असला तरी मजुरीच्या कामानिमित्त नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे स्थायिक झाला होता. गुरुवारी रात्री विशाल तोरणे हा पवार यांच्या घरी आला. यावेळी विकासने अनैैतिक संबंधास विरोध केल्याने मनिषा व विशाल या दोघांनी लाकडी दांडक्याने त्यास मारहाण केली. डोक्यावर केलेल्या गंभीर मारहाणीत विकासचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह शेतात नेवून टाकण्यात आला. त्यानंतर पत्नी मनिषा पवार ही फरार झाली तर विशाल तोरणे याने श्रीरामपूर शहरातील सूतगिरणी येथे रात्री मुक्कामी केला. त्यानंतर त्याने दुस-या दिवशी शुक्रवारी सकाळी पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. गुरुवारी (दि.५) रात्री साडे दहा ते अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.याप्रकरणी मयताची पत्नी मनिषा विकास पवार ही फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
मयताचा भाऊ अण्णासाहेब इंद्रभान पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात दोघा आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत पथवे याप्रकरणी पुढील तपास करत आहे.

 

 

Web Title: New wife murdered by wife