कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक, आढळले ३९५३ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:20 IST2021-05-01T04:20:00+5:302021-05-01T04:20:00+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने ३,९५३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता २३ हजार ...

New high of corona patient population, found 3953 infected | कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक, आढळले ३९५३ बाधित

कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक, आढळले ३९५३ बाधित

अहमदनगर : जिल्ह्यात शुक्रवारी नव्याने ३,९५३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता २३ हजार २४१ इतकी झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी ३,१४८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४९ हजार ८०६ झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १,५६७, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १,५०५ आणि अँटिजेन चाचणीत ८८१ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा १११, अकोले ११४, जामखेड १५३, कर्जत ८८, कोपरगाव ८५, नगर ग्रामीण १३६, नेवासा ७६, पारनेर ११२, पाथर्डी २१, राहता ४७, राहुरी १०४, संगमनेर १७२, शेवगाव १३०, श्रीगोंदा ७४, श्रीरामपूर ५८, कॅंटोनमेंट बोर्ड ५२, मिलिटरी हॉस्पिटल २५ आणि इतर जिल्हा ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा ४४१, अकोले ३२, जामखेड १७, कर्जत १६, कोपरगाव ७५, नगर ग्रामीण १८७, नेवासा ३०, पारनेर ६५, पाथर्डी ३३, राहाता १६७, राहुरी ८७, संगमनेर १४४, शेवगाव ३१, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर १०५, कॅंटोनमेंट बोर्ड २२ आणि इतर जिल्हा २१ आणि इतर राज्य ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजेन चाचणीत आज ८८१ जण बाधित आढळले. यात मनपा १०८, अकोले ०५, जामखेड १०, कर्जत ०६, कोपरगाव ११०, नगर ग्रामीण ८३, नेवासा ५३, पारनेर ५०, पाथर्डी ०४, राहाता ६६, राहुरी ९४, संगमनेर ३३, शेवगाव ३८, श्रीगोंदा १९८, श्रीरामपूर ०७, कॅंटोनमेंट ०५ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

--------------

बरे झालेले रुग्ण : १,४९,८०६

उपचार सुरू असलेले रूग्ण : २३,२४१

मृत्यू : १,९९३

एकूण रूग्णसंख्या : १,७५,०४०

Web Title: New high of corona patient population, found 3953 infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.