नेवासा ग्रामपंचायत त्रिशंकू

By Admin | Updated: June 24, 2014 00:05 IST2014-06-23T23:44:13+5:302014-06-24T00:05:12+5:30

नेवासा : नेवासा बुद्रुक येथील १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कोणत्याच पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले नाही.

Nevasa Gram Panchayat Hung | नेवासा ग्रामपंचायत त्रिशंकू

नेवासा ग्रामपंचायत त्रिशंकू

नेवासा : नेवासा बुद्रुक येथील १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कोणत्याच पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. विजयी उमेदवारांनी सामुहिक मिरवणूक काढून आगळे वेगळे दर्शन घडविले. दहा जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात होते़
नेवासा बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूक रविवारी (दि. २२) झाली. ११ जागांपैकी अर्चना माळी ह्या बिनविरोध निवडून आल्याने १० जागांसाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सोमवारी (दि. २३) सकाळी तहसील कार्यालयामध्ये मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एच. एन. शिरसाठ यांनी काम पाहिले. या निवडणुकीत एकाही पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. सत्तास्थापनेसाठी मोठी चुरस होण्याची शक्यता आहे़ विजयी उमेदवारांनी काढलेल्या एकत्रित मिरवणुकीची मोठी चर्चा रंगली होती़
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Nevasa Gram Panchayat Hung

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.