नेवासा बुद्रूकच्या सरपंचपदी पेचे

By Admin | Updated: July 6, 2014 00:18 IST2014-07-05T23:13:35+5:302014-07-06T00:18:54+5:30

नेवासा : नेवासा बुद्रूक ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची शनिवारी (दि.५) बिनविरोध निवड झाली़ सरपंचपदी मनिषा पेचे तर उपसरपंचपदी भानुदास रेडे यांची निवड करण्यात आली.

Nevada Budruk's sarpanchapace | नेवासा बुद्रूकच्या सरपंचपदी पेचे

नेवासा बुद्रूकच्या सरपंचपदी पेचे

नेवासा : नेवासा बुद्रूक ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची शनिवारी (दि.५) बिनविरोध निवड झाली़ सरपंचपदी मनिषा पेचे तर उपसरपंचपदी भानुदास रेडे यांची निवड करण्यात आली.
मनिषा पेचे यांच्या सरपंचपदाच्या निवडीची सूचना सदस्य डॉ.योगीता हापसे यांनी मांडली. भानुदास बेरड यांच्या उपसरपंचपदाच्या निवडीची सूचना सदस्य संजय डौले यांनी मांडली. त्यास उपस्थित सदस्यांनी हात वर करून अनुमोदन दिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी शिरसाठ यांनी निवडणूक बिनविरोध झत्तल्याचे घोषीत केले. यावेळी अनिल पेचे, महेश हापसे, सुनील हापसे, सयाजी रेडे, भाऊसाहेब जायगुडे, माजी सरपंच बाबा कांगुणे, सदस्य बाबासाहेब शेंडे, ताराबाई यादव, लक्ष्मीबाई दळवी उपस्थित होते. अकरा सदस्य संख्या असलेल्या नेवासा बुद्रूकच्या ग्रा.पं. निवडणुकीत अर्चना माळी या बिनविरोध निवडून आल्या होत्या. १० जागांसाठी निवडणुकीत कोणत्याही पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. मात्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अनिल पेचे यांनी सरपंच, उपसरपंचाची ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला़ यावेळी ग्रा.पं. सदस्य दादासाहेब कोकणे, अर्चना माळी, संजय मारकळी, संगीता चांदणे हे चार सदस्य गैरहजर होते. निवडीनंतर सरपंच मनिषा पेचे व उपसरपंच भानुदास रेडे यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या निवडणुकीत गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Nevada Budruk's sarpanchapace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.