कोपरगावातील ‘‘त्या’’ दोघांचाही अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 19:37 IST2020-04-10T19:33:02+5:302020-04-10T19:37:10+5:30
कोरोनाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले.

कोपरगावातील ‘‘त्या’’ दोघांचाही अहवाल निगेटिव्ह
कोपरगाव : शहरातील शिवाजीरोड येथील ७० वर्षीय वृद्ध व लक्ष्मीनगर येथील ५५ वर्षीय महिला या दोघांना सर्दी, खोकल्याचा त्रास होत होता. त्यांची कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली. त्यात त्यांना न्युमोनियाचा त्रास असल्याचे निष्पन्न झाले. परंतु खबरदारी म्हणून पुढील तपासणीसाठी गुरुवारी( दि.९ एप्रिल ) नगर येथे पाठविण्यात आले होते. त्यांचा तपासणी अहवाल शुक्रवारी दुपारी प्राप्त झाला. त्यात दोघांचाही कोरोनाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले.
शहरातील वरील दोन्ही व्यक्ती त्यांना होत असलेल्या त्रासावर उपचार घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आले होते. त्यांची तपासणी करून एक्स रे काढला असता दोघांनाही न्युमोनियाचा त्रास असल्याचे निदर्शंनास आले. त्यामुळे तात्काळ नगर येथील सिव्हील हॉस्पिटल येथे कोरोनाची तपासणी करण्यासाठी पाठविले होते. शुक्रवारी (दि.१०) रोजी त्यांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे.