गरजू ३१४ जणांना घरकूल नाकारले

By Admin | Updated: May 6, 2016 23:25 IST2016-05-06T23:20:00+5:302016-05-06T23:25:26+5:30

अहमदनगर : रमाई आवास घरकूल योजनेंतर्गत महापालिकेसह नऊ नगरपालिकांच्या क्षेत्रात एक हजार ६१५ घरकुलांचे उद्दिष्ट होते़ मात्र, घरकुलांसाठी ३९१ लाभार्थींची निवड करण्यात आली़

Needs 314 needlessly refuse home | गरजू ३१४ जणांना घरकूल नाकारले

गरजू ३१४ जणांना घरकूल नाकारले

अहमदनगर : रमाई आवास घरकूल योजनेंतर्गत महापालिकेसह नऊ नगरपालिकांच्या क्षेत्रात एक हजार ६१५ घरकुलांचे उद्दिष्ट होते़ मात्र, घरकुलांसाठी ३९१ लाभार्थींची निवड करण्यात आली़ त्यापैकी जिल्ह्यातील २१८ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून, २३२ घरांची कामे प्रगतिपथावर तर १९८ कामांना अद्याप मुहूर्त मिळाला नाही़
जिल्ह्यात घरकुलांच्या कामांवर खर्च झालेला निधी ५ कोटी ६२ लाख तर शिल्लक निधी १३ कोटी ८ लाख आहे़ पालिकांकडे घरकुलासाठी निधी शिल्लक असताना केवळ यंत्रणेतील असलेला समन्वयाचा अभाव, यामुळे घरकुलांच्या कामात अडथळा येत आहे़ उद्दिष्टाच्या निम्म्याच लाभार्थींची घरकूल योजनेसाठी निवड करण्यात आली आहे़ नगर शहरासाठी १२५ घरकुलांचे उद्दिष्ट होते, परंतु ४१ लाभार्थींचीच निवड करण्यात आली आहे़ श्रीरामपूर नगरपालिका क्षेत्रात १३७, संगमनेर २४, कोपरगाव १८, राहुरी १००, देवळाली प्रवरा ४०, राहाता ९६, पाथर्डी ४१, श्रीगोंदा १३७ आणि शिर्डीत ७१ अशा एकूण ७०५ कामांना मंजुरी देण्यात आली़ घरकूल योजनेसाठी स्वत: ची जागा आवश्यक आहे़ मात्र, बहुतांश लाभार्थींकडे त्यांची स्वत: ची जागा नाही़ त्याचबरोबर एकाच कुटुंबातील सदस्यांकडून वेगळ्या घराची मागणी करणे, रेशनकार्ड स्वतंत्र नसणे, जागेसाठी अतिक्रमणमुक्तचे प्रमाणपत्र न जोडणे, अशा अनेक तांत्रिक अडचणीत आहेत़ त्यामुळे निधी शिल्लक असूनदेखील कामे पूर्ण होताना दिसत नाहीत़ राहाता नगरपालिका व शिर्डी नगरपंचायत घरकुले पूर्ण करण्यात आघाडीवर आहेत़
श्रीगोंदा नगरपालिकेने १३७ घरकुलांना मंजुरी दिली आहे़ मात्र, ४१ घरकुलांच्या कामांना मुहूर्त मिळाला नाही़ त्यामुळे लाभार्थींच्या घराचे स्वप्न हवेत विरले आहे. महापालिकेकडे एक कोटी ७९ लाखांचा निधी शिल्लक आहे़ कोपरगावमध्ये घरकुलांचा सर्वाधिक २ कोटी ६८ लाखांचा निधी शिल्लक आहे़ देवळाली प्रवरा येथील घरकुलांसाठीचा १ कोटी १७ लाखांचा निधी शिल्लक असून, घरांची आकडेवारी तळाला गेली आहे़
(प्रतिनिधी)
घरकुलांची अपूर्ण कामे
महापालिका-९, श्रीरामपूर-७२, संगमनेर-११, कोपरगाव-२, राहुरी-३३, देवळाली प्रवरा-१७, पाथर्डी-१०, श्रीगोंदा-४४
१९ कोटी ७२ लाख वितरीत
महापालिका- १ कोटी २५ लाख, श्रीरामपूर-४ कोटी ८७ लाख, संगमनेर-१ कोटी २५ लाख, कोपरगाव- २ कोटी ९० लाख, राहुरी-१ कोटी ७० लाख, देवळाली प्रवरा- १ कोटी ४४ लाख, राहाता-१ कोटी २१ लाख, पाथर्डी- ९६ लाख, श्रीगोंदा-१ कोटी ३४ लाख, शिर्डी-१ कोटी ६९ लाख़

Web Title: Needs 314 needlessly refuse home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.