माणुसकीच्या भावनेने एकमेकांना आधार देण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:21 IST2021-05-18T04:21:21+5:302021-05-18T04:21:21+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या लढ्यात माणुसकीच्या भावनेने एकमेकांना आधार देण्याची गरज आहे. संपूर्ण समाज दु:खात असताना आनंद साजरा करणे चुकीचे ...

माणुसकीच्या भावनेने एकमेकांना आधार देण्याची गरज
अहमदनगर : कोरोनाच्या लढ्यात माणुसकीच्या भावनेने एकमेकांना आधार देण्याची गरज आहे. संपूर्ण समाज दु:खात असताना आनंद साजरा करणे चुकीचे आहे. या भावनेने वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन कोविड सेंटरला हिंगे परिवाराने केलेली मदत प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
कोरोनाच्या संकटकाळात शिक्षक तन, मन व धनाने आपले योगदान देत असताना शिक्षकाने आपल्या मुलीचा वाढदिवस कोविड सेंटरमध्ये सामाजिक उपक्रमाने साजरा केला. माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे यांनी आपली मुलगी आरवी हिंगे हिच्या वाढदिवसानिमित्त सर्व खर्चांना फाटा देत, कोरोनाच्या परिस्थितीची जाणीव ठेवून वाळुंज (ता. नगर) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित कोविड सेंटरला वाफेचे मशीन, सॅनिटायझर, खोकल्याचे औषधे, बिस्किटे, फळे आदी विविध वस्तू असलेल्या सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीची भेट दिली.
आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते कोविड सेंटरला देण्यात आलेली विविध साहित्याची भेट डॉक्टर व परिचारिकांकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक तथा शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, सविता हिंगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के, आरवी हिंगे, माजी सरपंच बाळासाहेब दरेकर, मकरंद हिंगे, अनुष्का हिंगे, विराज बोडखे, भाऊ पांडुळे, विजय शेळमकर, डॉ. अमृता पारकर, कदम मॅडम, संगीता मते आदी उपस्थित होते.
पाहुण्यांचे स्वागत महेंद्र हिंगे यांनी केले. सविता हिंगे यांनी कोरोनाकाळात सामाजिक बांधिलकी ठेवून प्रत्येकाने योगदान देण्याची भावन विशद केली. बाबासाहेब बोडखे यांनी कोरोना रुग्णांची सेवा आमदार संग्राम जगताप सातत्याने करीत आहे. स्वत: कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांच्या नातेवाइकांना आधार देत आहे. कोरोना हा गंभीर आजार नसून, त्याला वेळेवर उपचार न केल्याने प्रकृती गंभीर बनत आहे. नागरिकांनी जागृत राहून वेळेवर उपचार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कोविड सेंटरला शंभर वाफेचे मशीन, चार ड्रम सॅनिटायझर, दोन सॅनिटायझर स्टॅण्ड, दोन ड्रम खोकल्याचे औषध, बिस्कीट, फळे व इतर आवश्यक वस्तू देण्यात आल्या. कोविड सेंटरमध्ये कोरोनातून बरे झालेल्या पंधरा रुग्णांना निरोप देऊन घरी पाठविण्यात आले.
-------------
फोटो मेल
कोरोना सेंटर मदत
माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे यांनी आपली मुलगी आरवी हिंगे हिच्या वाढदिवसानिमित्त वाळूंज (ता. नगर) येथील कोविड सेंटरला विविध वस्तू असलेल्या सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीची भेट आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सुपुर्द केली.