ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची गरज वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST2021-03-24T04:18:31+5:302021-03-24T04:18:31+5:30
अहमदनगर : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, आता उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. सर्वाधिक रुग्ण नगर शहरात आढळून ...

ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची गरज वाढली
अहमदनगर : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, आता उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. सर्वाधिक रुग्ण नगर शहरात आढळून येत आहेत. कोरोनाचे संशयित रुग्ण सर्वात आधी जिल्हा रुग्णालयात धाव घेत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात कोविड बेडची संख्या वाढविण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली, तरी सध्या सरकारी आणि खासगी रुग्णालयात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. असे असले, तरीही सध्या दोन्ही प्रकारच्या बेडची पुरेशी उपलब्धता आहे. पॉझिटिव्ह रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. याशिवाय रुग्णांना महापालिकेच्या दोन कोविड केअर सेंटरमध्येही सुविधा देण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालय, बुथ हॉस्पिटल, महापालिकेची कोविड केअर सेंटर आणि नगर शहरातील खासगी रुग्णालयात सध्या कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या मागणी वाढली असली, तरी पुरेसे बेड उपलब्ध असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
---------------
जिल्हा रुग्णालयात उपचार घेणारे
कोरोना पॉझिटिव्ह - १९५
संशयित - १०५
उपलब्ध ऑक्सिजन बेड - ३५०
उपलब्ध व्हेंटिलेटर बेड - ८५
क्षमता वाढविणार - ४०० बेड
--------------------
नगर शहरातील खासगी व सरकारी रुग्णालयातील स्थिती
ऑक्सिजन बेडची संख्या - ५६२
ऑक्सिजन बेडवर उपचार घेणारे - ११०
शिल्लक बेड - ४५२
व्हेंटिलेटर बेडची संख्या - २८६
व्हेंटिलेटरवर उपचार घेणारे - २५
उपलब्ध व्हेंटिलेटर - २६१
------------------
डमी- नेट फोटो
२३ व्हेंटिलेटर
२३ कोरोना पेशंट व बेड डमी
२३ बेड
२३ ऑक्सिजन
२३ डॉक्टर
२३ आयसीयू
-----------------
आणखी दोन कोट असतील