राष्ट्रवादीचे नगर जिल्ह्यातील आमदार मतदारसंघातच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 12:32 IST2019-11-23T12:30:19+5:302019-11-23T12:32:28+5:30

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी तातडीने शपथ घेतल्यानंतर राजकीय भूकंप झाला आहे. या निर्णयाची मतदारांना जशी कल्पना नव्हती तशी राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांना देखील कल्पना देखील नाही.

NCP's Municipal Constituency in the District | राष्ट्रवादीचे नगर जिल्ह्यातील आमदार मतदारसंघातच 

राष्ट्रवादीचे नगर जिल्ह्यातील आमदार मतदारसंघातच 

अहमदनगर :  मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी तातडीने शपथ घेतल्यानंतर राजकीय भूकंप झाला आहे. या निर्णयाची मतदारांना जशी कल्पना नव्हती तशी राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांना देखील कल्पना देखील नाही.
नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत. यापैकी डॉक्टर किरण लहामटे, निलेश लंके, आशुतोष काळे, प्राजक्त तनपुरे हे आमदार आपापल्या मतदारसंघात आहेत. काळे व तनपुरे यांच्याशी संपर्क झाला असता आम्ही मुंबईकडे निघालो असल्याचे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. आमदार संग्राम जगताप हे मुंबईतच आहेत. रोहित पवार हेही मुंबईत आहेत. शनिवारच्या राजकीय घडामोडीबाबत आम्हाला काहीही कल्पना नाही. पाठिंब्याची पत्रे आम्ही अगोदरच विधीमंडळ नेत्यांकडे दिलेली आहेत. त्यामुळे काय घडामोडी आहेत ते मुंबईत गेल्यावरच समजेल, असे बहुतांश आमदारांनी सांगितले.

Web Title: NCP's Municipal Constituency in the District