शेवगावात राष्ट्रवादीचा स्थापना दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:15 IST2021-06-11T04:15:08+5:302021-06-11T04:15:08+5:30

शेवगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त शेवगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, ...

NCP's foundation day celebrated in Shevgaon | शेवगावात राष्ट्रवादीचा स्थापना दिन साजरा

शेवगावात राष्ट्रवादीचा स्थापना दिन साजरा

शेवगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त शेवगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री चंद्रशेखर घुले, पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक पंडितकाका भोसले, बाजार समितीचे माजी सभापती संजय फडके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाने, बाजार समिती सभापती अनिल मडके, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष कुष्णा सातपुते, वहाब शेख, तुफेल शेख, समीर शेख, संतोष जाधव, अशोक देवढे, सरपंच प्रदीप काळे, गोविंद कडिमंचे आदी उपस्थित होते.

Web Title: NCP's foundation day celebrated in Shevgaon