राष्ट्रवादीची गटबाजी उफाळली ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:17 IST2021-06-04T04:17:35+5:302021-06-04T04:17:35+5:30
कोतूळ : अकोले तालुक्यातील कोतूळ व ब्राम्हणवाडा येथे जिल्हा परिषदेच्या नव्याने आलेल्या रूग्णवाहिकेचे दोनदा लोकार्पण झाले. विशेष म्हणजे ...

राष्ट्रवादीची गटबाजी उफाळली ?
कोतूळ : अकोले तालुक्यातील कोतूळ व ब्राम्हणवाडा येथे जिल्हा परिषदेच्या नव्याने आलेल्या रूग्णवाहिकेचे दोनदा लोकार्पण झाले. विशेष म्हणजे जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख व आमदार डाॅ. किरण लहामटे हे एकाच पक्षाचे असताना ही वेगवेगळी उद्घाटने म्हणजे राष्ट्रवादीत फुटीचा सिग्नल असल्याचे समोर आले आहे.
गेल्या काही दिवसापासून आमदार डाॅ. किरण लहामटे आणि जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख यांच्यात विकासकामांच्या उद्घाटन वरून लहीत, चास येथील जिल्हा परिषद रस्ता उद्घाटनाचा किस्सा ताजा असतानाच मंगळवारी एक जूनला आमदार लहामटे यांनी ब्राम्हणवाड्यात या ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण केले. त्या अगोदर रमेश देशमुख यांनी २० मे ला या ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण केले. विशेष दोन्ही नेते राष्ट्रवादीचे आहेत.
जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जवळील नेते आहेत. गेल्या दोन महिन्यात माजी मंत्री पिचडांच्या प्रेमाखातर भाजपवासी झालेल्या मोठ्या नेत्यासह डझनभर पुढारी अजित पवारांच्या उपस्थितीत हाती घड्याळ बांधून आले. यात बी. जे. देशमुख, रमेश देशमुख, राजेंद्र देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादीत मात्तबरांची गर्दी झाली. हीच बाब आमदार लहामटे व त्यांचे विधानसभा निवडणुकीतील कार्यकर्ते यांना खटकत असावी. ब्राम्हणवाडा परिसरात एका कार्यकर्त्याने भावनिक साद घातल्याने आमदारांना जावे लागले असे बोलले जाते. त्यात दोन्ही ठिकाणी आयोजक ब्राम्हणवाड्याचे उपसरपंच सुभाष गायकर आहेत.
..................... आमच्या ब्राम्हणवाडा गावात रूग्णवाहिका नव्हती. जिल्हा परिषद रूग्णवाहिका देणार असल्याचे समजल्यावर जिल्हा परिषद सदस्यांचे मागणीने सोय झाली. उद्घाटन ही केले. मात्र आमदारांनी पुन्हा लोकार्पण केले. त्यात जिल्हा परिषद सदस्य आणि पक्षाचा उल्लेखही केला नाही. आम्ही तीन पिढ्या पवारांचे राजकीय समर्थक व नात्याची आहोत. सध्या आम्हाला डावललं जातंय कोरोना संपताच ब्राम्हणवाडा, बेलापूर , बदगी, जांभळे येथील युवकांचे शिष्टमंडळ अजितदादांच्या कानी ही बाब घालेल.
- दीपक गायकर, राष्ट्रवादी युवा नेते, ब्राम्हणवाडा.
...........
फोटो- ०३अकोले१, आमदार लोकार्पण करताना
फोटो - ०३ अकोले२, जिल्हा परिषद सदस्य लोकार्पण करताना
030621\20210526_100519.jpg
जिल्हा परिषद सदस्य रमेश देशमुख लोकार्पण करताना