राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षाच्या शेतातील जुगारावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:56+5:302021-06-21T04:15:56+5:30

श्रीगोंदा : नगर येथील पोलीस पथकाने शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्त्यावरील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सोनू ...

NCP youth raids gambling on the mayor's farm | राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षाच्या शेतातील जुगारावर छापा

राष्ट्रवादी युवक शहराध्यक्षाच्या शेतातील जुगारावर छापा

श्रीगोंदा : नगर येथील पोलीस पथकाने शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्त्यावरील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सोनू कोथिंबिरे यांच्या शेतातील खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यात दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी मुंबईतील साईनाथ रवींद्र मोकाशी याला अटक केली.

पोलिसांनी ६ दुचाकी, २ हजाराची रोकड, जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पाच जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. मात्र लिंबोणीच्या बागेत लपलेला साईनाथ मोकाशी याला पोलिसांनी पकडले.

सहायक पोलीस निरीक्षक सतीश गावित, सहायक उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल परदेशी, किरण आवारे हे पोलीस पथकात होते.

---

स्थानिक पोलिसांना चेकमेट..

श्रीगोंदा पोलीस ठाण्यापासून दोन किलोमीटर अंतरावर हा प्रकार सुरू होता. तरीही स्थानिक पाेलिसांनी कारवाई केली नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अखेर नगरहून आलेल्या पथकाने ही कारवाई केली. नगरच्या पथकाने एकप्रकारे स्थानिक पोलिसांना चेकमेट दिला, अशी चर्चा होत आहे.

Web Title: NCP youth raids gambling on the mayor's farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.