राष्ट्रवादीचे आमदार जगताप पिता-पुत्रांवर कारवाई करणार- फाळके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 13:49 IST2018-12-28T13:40:51+5:302018-12-28T13:49:43+5:30
महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या बाबासाहेब वाकळे यांच्या बाजुने मतदान करणाऱ्या राष्ट्रवादी नगरसेवकांवर व

राष्ट्रवादीचे आमदार जगताप पिता-पुत्रांवर कारवाई करणार- फाळके
अहमदनगर : महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या बाबासाहेब वाकळे यांच्या बाजुने मतदान करणाºया राष्ट्रवादी नगरसेवकांवर व राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप यांच्या पक्ष कारवाई करेल, असे पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नगरला आमच्या नेत्यांनी पक्षादेश डावलला असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे जगताप पिता-पुत्र अडचणीत सापडणार आहेत.
कोणत्याही परिस्थितीत नगर महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती करायची नाही, असा आदेश शरद पवार, अजित पवार व जयंत पाटील यांनी नगरच्या नेत्यांना दिला होता. मात्र, नगरच्या स्थानिक नेत्यांनी हा आदेश पाळलेला नाही. याला स्थानिक आमदार जबाबदार आहेत. याबाबीची पक्षाने गंभीर दखल घेतली असून, पक्षादेश डावलणाºया सर्वांवर कारवाई होईल, असे फाळके म्हणाले.
दरम्यान भाजपसोबत जाण्याचा निर्णय जगताप पिता-पुत्रांचा आहे. या निर्णयाशी मी असहमत आहे. जलसंपदा मंत्री गिरीष महाजन हे माझ्या घरी चहापाण्याला आले होते. पण महापौर निवडणुकीसंदर्भात आमच्यात चर्चा झाली नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर यांनी सांगितले.