राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे ठाकरे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:20 IST2021-01-25T04:20:39+5:302021-01-25T04:20:39+5:30

अहमदनगर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार ...

NCP greets Thackeray | राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे ठाकरे यांना अभिवादन

राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे ठाकरे यांना अभिवादन

अहमदनगर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी आमदार संग्राम जगताप, शहर-जिल्हा अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, नगरसेवक अजिंक्य बोरकर, बाळासाहेब पवार, अभिजित खोसे, बाळासाहेब जगताप, संभाजी पवार, संतोष ढाकणे, वैभव ढाकणे, विजय फुलसौंदर आदी उपस्थित

होते. यावेळी आमदार जगताप म्हणाले, बोस आणि ठाकरे यांच्या चरित्रातून युवकांनी राष्ट्रप्रेमाची शिकवण घेण्याची गरज आहे. त्याच्या संघर्षमय जीवनातून त्यांनी समाज घडवण्याचे काम केले होते. आपल्या तत्त्वाशी कधीही तडजोड न करता ते आपले काम करत होते. समाजाच्या उन्नतीसाठी अखंड प्रयत्न करत राहिले. आपल्या जीवनामध्ये त्यांनी देशहिताला प्राधान्य दिले.

--

फोटो- २३ संग्राम जगताप

शहर-जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना आमदार संग्राम जगताप. समवेत प्रा. माणिक विधाते व पदाधिकारी.

Web Title: NCP greets Thackeray