लग्नातील दागिने घेऊन नवरीबाई पळाली प्रियकरा बरोबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 14:02 IST2020-07-26T14:02:03+5:302020-07-26T14:02:29+5:30
श्रीगोंदा : बारामती तालुक्यातील तरडोली येथील एका मुलीचे बाबुर्डी येथील तरुणाबरोबर लग्न झाले. परंतु अवघ्या पंधरा दिवसातच दीड लाखाचे दागिने घेऊन नवरीबाईने प्रियकराबरोभर धुम ठोकली आणि प्रियकराबरोबर लग्न केले.

लग्नातील दागिने घेऊन नवरीबाई पळाली प्रियकरा बरोबर
श्रीगोंदा : बारामती तालुक्यातील तरडोली येथील एका मुलीचे बाबुर्डी येथील तरुणाबरोबर लग्न झाले. परंतु अवघ्या पंधरा दिवसातच दीड लाखाचे दागिने घेऊन नवरीबाईने प्रियकराबरोभर धुम ठोकली आणि प्रियकराबरोबर लग्न केले.
बाबुर्डी येथील त्या नवर देवाने दिलेल्या फियार्दीवरून वैष्णवी संदेश शिंदे व संदेश नंदकिशोर शिंदे रा तरडोली ता बारामती यांच्या या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैष्णवी चे बाबुर्डी येथील एका तरुणाबरोबर २५ जुनला लग्न झाले त्यानंतर तीने ११ जुलै ला प्रियकराबरोबर धुम ठोकली आणि १७ जुलै ला आळंदीत वैष्णवीने संदेश बरोबर लग्न केले.