राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहर कार्यकारिणी जाहीर
By Admin | Updated: July 16, 2014 00:44 IST2014-07-15T23:24:23+5:302014-07-16T00:44:20+5:30
अहमदनगर: बारा उपाध्यक्ष, अकरा सरचिटणीस व बारा सचिव असलेली राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसची शहर कार्यकारिणी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहर कार्यकारिणी जाहीर
अहमदनगर: बारा उपाध्यक्ष, अकरा सरचिटणीस व बारा सचिव असलेली राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसची शहर कार्यकारिणी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत ३५ जणांचा समावेश असून राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्यांना कार्यकारिणीत स्थान दिल्याची माहिती काळे यांनी
दिली.
कार्यकारिणी जाहीर करताना शहर व उपनगराचा समतोल साधण्यात आला आहे. वकील, अभियंता, कृषी पदवीधर, व्यवस्थापन शास्त्र यांच्याबरोबरीनेच कामगार, भाजीवाला, रिक्षावाल्या युवकांनाही कार्यकारिणीत स्थान देण्यात आल्याचे काळे यांनी सांगितले. कार्यकारिणी निवडताना पक्षाने इच्छुकांचे अर्ज मागविले होते. अर्जानंतर मुलाखतीही घेण्यात आल्या. कार्यकारिणीत निवडलेले बहुतांश चेहरे हे नवोदित आहेत.
कार्यकारिणी: उपाध्यक्ष- विलास बुगे, अरुण लबडे, दीपक खेडकर, पुष्कर रोहोकले, अनिकेत भंडारी, वैभव सुडके, अभिषेक शिंदे, शेखर भिसे, अभिजीत खरात, रियाझ शेख, श्रावण काळे, महेश फिरोदे. सरचिटणीस- स्वप्नील पाठक, आकाश वग्गा, विकास भालेराव, विशाल औटी, राहुल चिखले, महावीर भंडारी, स्वप्नील शिंदे, संदीप साळे, दीपक पाटील, सतीश नवंगुणे,
विनोद कांबळे. सचिव- मयुर जगताप, आकाश साठे, किरण लटपटे,
सागर साळवे, अतुल पडोळे, उमेश भांबरकर, ऋषीकेश ताठे, अभिषेक जगताप, रोहन पिसोरे, चैतन्य ससे, सचिन भोसले.
(प्रतिनिधी)