शेतकरी संपात राष्ट्रवादीची लुडबूड

By Admin | Updated: June 2, 2017 14:20 IST2017-06-02T14:20:54+5:302017-06-02T14:20:54+5:30

शेतकऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने सुरू केलेल्या संपात आता राष्ट्रवादी काँग्रेसने लुडबुड सुरू केली असून

Nationalist Movement in Farmer's Stage | शेतकरी संपात राष्ट्रवादीची लुडबूड

शेतकरी संपात राष्ट्रवादीची लुडबूड

आॅनलाईन लोकमत
अहमदनगर दि़ २ - शेतकऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने सुरू केलेल्या संपात आता राष्ट्रवादी काँग्रेसने लुडबुड सुरू केली असून, आम्ही केलेल्या जनजागृतीमुळे शेतकरी संपावर गेला, असे विधान माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले़ दरम्यान ही बाब पक्षाच्या इतरांच्या लक्षात येताच त्यांनी शब्द फिरवित शेतकरी संपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचे सांगितले़
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ शेतकरी कर्जमाफीची सर्वप्रथम मागणी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याचे सांगून मागील माहिन्यात संघर्ष यात्रा काढून शेतकऱ्यांची जनजागृती केली़ त्याचाच हा परिपाक असल्याचे कळमकर म्हणाले़
लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने खोटे बोलून शेतकऱ्यांची मते घेतली़ मात्र सत्तेवर येताच त्यांनी शेतकऱ्यांच्याविरोधात भूमिका घेतली असून, राज्याचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप घुले यांनी यावेळी केला़ राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांसोबत आहे़ शेतकऱ्यांना संप काळात मदत करण्यास राष्ट्रवादी तयार आहे़ वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून कार्यकर्ते संपात सहभागी हातील़ राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनिमित्त प्रत्येक तालुक्यातील दहा हजार शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेवून शेतकरी सन तहसीलदारांना दिली जाणार असल्याचे घुले म्हणाले़

Web Title: Nationalist Movement in Farmer's Stage