सोमैया महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:37 IST2021-03-04T04:37:45+5:302021-03-04T04:37:45+5:30

कोपरगाव : शहरातील के. जे. सोमैया महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून मायक्रो बायोलॉजी विभागाने मुलांसाठी मायक्रो फेस्ट २०२१ ...

National Science Day celebrated at Somaiya College | सोमैया महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

सोमैया महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

कोपरगाव : शहरातील के. जे. सोमैया महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून मायक्रो बायोलॉजी विभागाने मुलांसाठी मायक्रो फेस्ट २०२१ या उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये विभागातील मुलांनी वेगवेगळे विज्ञान मॉडेल्स तयार केले होते. त्याचे प्रदर्शन मांडण्यात आले होते़, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली.

या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून न्यू आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय, अहमदनगर येथील मायक्रो बायोलॉजी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. जी. पी. कुकरेजा उपस्थित होते. सदर विज्ञान दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयातील लाईफ सायन्स विभागाने प्रा. जी. पी. कुकरेजा यांनी रिसेंट ट्रेण्ड्स इन लाईफ सायन्स रिसर्च या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील मायक्रो बायोलॉजी विभागाचे विभागप्रमुख आकाश पवार, योगेश चौधरी, पूजा गखड, प्रगती शेटे, वृषाली आहेर, प्रियंका शिरसाठ, अमोल दहे यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमासाठी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बी. बी. भोसले, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस. बी. काळे, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. डी. गवळी, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बी. एस. गायकवाड, कार्यालयीन अधीक्षक डॉ. अभिजित नाईकवाडे हे उपस्थित होते.

Web Title: National Science Day celebrated at Somaiya College