राष्ट्रीय पाठशाळेत स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:20 IST2020-12-22T04:20:26+5:302020-12-22T04:20:26+5:30
वसतिगृहात गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे, अधीक्षक बाबासाहेब पातकळ, संजय बोबडे, शिक्षक गणेश काथवटे, कर्मचारी तुकाराम विघ्ने ...

राष्ट्रीय पाठशाळेत स्वच्छता मोहीम
वसतिगृहात गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे, अधीक्षक बाबासाहेब पातकळ, संजय बोबडे, शिक्षक गणेश काथवटे, कर्मचारी तुकाराम विघ्ने यांनी केले. तत्पूर्वी राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूलमधील सर्व शिक्षकांनी शालेय परिसरात स्वच्छता केली. त्यानंतर खेळाच्या मैदानावर वाढलेले गवत, कचरा व इतर बाबींची स्वच्छता करून परिसर सुशोभित केला. मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे म्हणाले, दरवर्षी संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त शाळेचे व वसतिगृहाचे विद्यार्थी शहरात स्वच्छताफेरी काढून स्वच्छतेविषयी जनजागृती करतात. परंतु, यावर्षी कोरोनामुळे शाळेत व वसतिगृहात विद्यार्थी उपस्थित नाहीत. त्यामुळे स्वच्छताफेरी काढता आली नाही.
या मोहिमेत प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा जोशी, बाबासाहेब लोंढे, सतीश काळे, गणेश काथवटे, प्रवीण उकिर्डे, रामनाथ घनवट, बाबासाहेब बेडके, सुशील नन्नवरे, कविराज बोटे, संजय सकट, अशोक चव्हाण, संजय बोबडे, तुकाराम विघ्ने, विजय वाणी आदींसह सर्व शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते.
---------
फोटो मेल राष्ट्रीय पाठशाळा
संत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय पाठशाळा परिसरात शिक्षकांनी स्वच्छता केली.