ढवळगाव अंगणवाडीत राष्ट्रीय बालिका दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:30 IST2021-02-05T06:30:20+5:302021-02-05T06:30:20+5:30
यानिमित्ताने किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छतेबद्दल माहिती, बेटी बचाओ, बेटी पढाओ, मुलगी नसती तर जग नसते.. असा संदेश देण्यात आला. ...

ढवळगाव अंगणवाडीत राष्ट्रीय बालिका दिन साजरा
यानिमित्ताने किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छतेबद्दल माहिती, बेटी बचाओ, बेटी पढाओ, मुलगी नसती तर जग नसते.. असा संदेश देण्यात आला.
चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, झाडे लावा, झाडे जगवा, संगीतखुर्ची यासह विविध स्पर्धोंचे आयोजन करून मुलींची रॅली काढण्यात आली होती. किशोरवयीन मुली, महिलांकरिता आरोग्य व पोषण महिलांना कायदेविषयक माहिती देण्यात आली. बेटी बचाओ, बेटी पढाओ, योजनेंतर्गत गावपातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला व मुली यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या शिक्षक सुनंदा रमेश ठुबे, अंगणवाडी सेविका चित्रा वेताळ, सुधा शिंदे, मदतनीस मंदा शिंदे, अलका बोरगे व शालेय विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
..
फोटो-२५ढवळगाव बालिका दिन
..
ओळी-ढवळगाव येथील अंगणवाडीत २१ ते २६ जानेवारीदरम्यान राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला.