वाळवणे येथे सोमवारी नाथ जन्म सोहळा
By | Updated: December 5, 2020 04:39 IST2020-12-05T04:39:29+5:302020-12-05T04:39:29+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील नाथ जन्म सोहळा सोमवारी (दि.७) होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू ...

वाळवणे येथे सोमवारी नाथ जन्म सोहळा
सुपा : पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील नाथ जन्म सोहळा सोमवारी (दि.७) होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये. सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन भैरवनाथ देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष सचिन पठारे यांनी केले आहे. भाविकांनी मास्कचा वापर करावा, स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी. सध्या भैरवनाथ देवस्थानच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. मंदिरासाठी राजस्थानवरून खास दगड आणला जात आहे. त्यासाठी १ कोटी ८५ लाख रुपये खर्च येणार असल्याने भाविकांनी त्यासाठी मदत करावी, असे आवाहन पठारे यांनी केले.