शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-पुणे महामार्गावर सी.एन.जी. गॅस वाहतूक करणारा टेम्पो उलटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 10:22 IST

Accident news : गॅस गळती सुरू झाल्याने पुण्याकडून नाशिककडे जाणारी लेन बंद करण्यात आली होती.

घारगाव (जि. अहमदनगर) - नाशिक- पुणे महामार्गावर पुण्याहून नाशिककडे जाणारा सीएनजी गॅस वाहतूक करणाऱ्या आयशर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कुरकुंडी (ता.संगमनेर) गावच्या हद्दीत पलटी झाला. या अपघातात चालक जखमी झाला. कमी प्रमाणात गॅस गळती सुरू असल्याने मोठी दुर्घटना टळली. शनिवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणारा सीएनजी गॅस आयशर क्र. (एम. एच. १४  जे. एल. ३१९२) संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी गावच्या हद्दीतून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून आयशर वेगात रस्त्यालगत पलटी झाला. त्यामुळे गॅस गळती सुरू झाली.

घटनेची माहिती समजताच महामार्ग डोळासणे मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांसह कर्मचारी ,घारगाव पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार आदिनाथ गांधले , पोलीस कॉन्स्टेबल नामदेव बिरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये चालक अमोल बारवे (रा. वाशीम) हे जखमी झाले. त्यांना खाजगी रुग्णवाहिकेद्वारे संगमनेर येथे पाठविण्यात आले. 

दरम्यान, गॅस गळती सुरू झाल्याने पुण्याकडून नाशिककडे जाणारी लेन बंद करण्यात आली होती. एकेरी वाहतूक सुरू होती. शंभर मीटर परिसरात बॅरिकेट्स लावण्यात आले होते. रात्रभर काहीशा प्रमाणात गॅस गळती सुरू होती. संगमनेर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. रविवारी सकाळी गॅस कंपनीची टीम आल्यानंतर त्यांनी गॅस गळती बंद केली त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिकPuneपुणे