अध्यक्षपदी नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग उपाध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:42 IST2021-02-05T06:42:43+5:302021-02-05T06:42:43+5:30
भेंडा : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी नरेंद्र घुले तर उपाध्यक्षपदी पांडुरंग अभंग यांची बिनविरोध ...

अध्यक्षपदी नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग उपाध्यक्ष
भेंडा : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना अध्यक्षपदी नरेंद्र घुले तर उपाध्यक्षपदी पांडुरंग अभंग यांची बिनविरोध निवड झाली आहे.
भेंडा साखर कारखाना संचालक मंडळाची निवडणूक घुले बंधूंच्या नेतृत्वाखाली २१ जानेवारी रोजी बिनविरोध झाली होती. पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांची सभा मंगळवारी (दि.२ फेब्रुवारी) रोजी ११ वाजता कारखाना अतिथीगृहात झाली.
अध्यक्ष पदासाठी नरेंद्र मारुतराव घुले व उपाध्यक्ष पदासाठी पांडुरंग अभंग यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी यांनी केली.
यावेळी मावळते अध्यक्ष चंद्रशेखर घुले, ज्येष्ठ संचालक ॲड. देसाई देशमुख, डॉ.क्षितिज घुले, काकासाहेब नरवडे, विठ्ठलराव लंघे, कामगार संघटनेचे सरचिटणीस नितीन पवार, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.
...
फोटो-०२घुले-अभंग
...