राजकीय विरोधातून केडगाव हत्याकांडात नाव गोवले : आ.शिवाजी कर्डिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 15:11 IST2018-05-25T15:11:08+5:302018-05-25T15:11:26+5:30

केडगाव दुहेरी हत्याकांड व जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावर हल्ला याच्याशी माझा काहीही संबंध नसताना माझे नाव यात गोवून विरोधकांनी डाव रचून मला राजकारणातून बाजूला करण्याचा प्रयत्न केला आहे.

Named the Kedgaon assassination from political opposition: A. Shivaji Cordillay | राजकीय विरोधातून केडगाव हत्याकांडात नाव गोवले : आ.शिवाजी कर्डिले

राजकीय विरोधातून केडगाव हत्याकांडात नाव गोवले : आ.शिवाजी कर्डिले

केडगाव : केडगाव दुहेरी हत्याकांड व जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयावर हल्ला याच्याशी माझा काहीही संबंध नसताना माझे नाव यात गोवून विरोधकांनी डाव रचून मला राजकारणातून बाजूला करण्याचा प्रयत्न केला आहे. न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यावर सगळे सत्य समोर येणारच आहे. मला विरोधक राजकारणातून कधीही संपवू शकणार नाही, असे प्रतिपादन आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले.
नगर तालुक्यातील पिंपळगाव उजैनी येथील विविध विकास कामांचे भुमिपूजन आ. कर्डिले यांच्या हस्ते व माजी सभापती बाजीराव गवारे यांचे अध्यक्षतेखाली झाला. यावेळी कर्डिले बोलत होते. सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पिय निधीअंतर्गत पिंपळगाव उज्जैनी (ता.नगर ) ते कापुरवाडी रस्त्याची सुधारणा व डोंगरी विकास निधीअंतर्गत जवळपास २ कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बाजार समीती सभापती विलास शिंदे , भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग उपस्थीत होते.

 

Web Title: Named the Kedgaon assassination from political opposition: A. Shivaji Cordillay