उड्डाणपुलास आंबेडकरांचे नाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:27 IST2021-02-17T04:27:16+5:302021-02-17T04:27:16+5:30
यावेळी आरपीआयचे उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, नगरसेवक राहुल कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, भारतीय बौद्ध ...

उड्डाणपुलास आंबेडकरांचे नाव द्या
यावेळी आरपीआयचे उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, नगरसेवक राहुल कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, अमित काळे, अविनाश भोसले, राहुल वैराळ, दीपक गायकवाड, आरपीआय गवई गटाचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सोमा शिंदे, टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष बंटी भिंगारदिवे, सोन्याबापू सूर्यवंशी, शिवराम पाटोळे आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
अनेकवेळा डॉ. आंबेडकरांनी शहराला भेट दिल्याचा इतिहास आहे. शहराशी त्यांचे भावनिक नाते जोडले गेले असून, या उड्डाणपुलास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची सर्व आंबेडकरी जनतेची मागणी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. --------------
फोटो - १६आंबेडकर संघटना
नगर शहरात होत असलेल्या उड्डाणपुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीचे निवेदन विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.