पंकजा मुंडे यांचा निर्णय योग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 22:06 IST2017-09-30T22:01:42+5:302017-09-30T22:06:34+5:30

पाथर्डी (जि. अहमदनगर) : पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळावा न घेण्याविषयी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असून, या निर्णयाचे स्वागत करतो, परंतु यासाठी त्यांनी जो वाद घातला तो टाळला असता, तर अधिक बरे झाले असते, असे मत भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी व्यक्त करून यापुढील काळात त्यांनी ‘त्या’ ठिकाणीच मेळावा घ्यावा. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो, असेही ते म्हणाले.

namdev shatri,said,about,dasara,melewa, | पंकजा मुंडे यांचा निर्णय योग्य

पंकजा मुंडे यांचा निर्णय योग्य

थर्डी (जि. अहमदनगर) : पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर दसरा मेळावा न घेण्याविषयी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य असून, या निर्णयाचे स्वागत करतो, परंतु यासाठी त्यांनी जो वाद घातला तो टाळला असता, तर अधिक बरे झाले असते, असे मत भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी व्यक्त करून यापुढील काळात त्यांनी ‘त्या’ ठिकाणीच मेळावा घ्यावा. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करतो, असेही ते म्हणाले.पत्रकारांशी बोलताना नामदेव शास्त्री म्हणाले, भगवानगड आता खºया अर्थाने राजकारणापासून मुक्त झाला आहे. वादाला आता कायमची मुक्ती मिळाली आहे. भगबानबाबांच्या मनात जे होते, ते आता घडले आहे. यापुढील काळात भगवानगडाची ओळख आता पैठण, पंढरपूर व आळंदी सारखी होईल. गडावर आता कोणता व्हीआयपी येणार, याची आता चर्चा होणार नाही. गडावर येणाºयांनी आता भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घ्यावे, कोणतीही अपेक्षा ठेवू नये. भगवानगडाने आतापर्यंत जे भोगले, ते फार भोगले. आता त्याला पूर्णविराम मिळाला आहे. आजच्या त्यांच्या सभेत त्यांनी जे संस्कृत सुभाषित म्हटले, त्याचा अर्थ मला चांगला समजतो. कोणी कृष्णाने सांगितलेला संदेश सांगत असले, तरीही आपण मनुष्य आहोत, हे लक्षात ठेवावे. सुदर्शन चक्र मी हातात घेतलेले नाही. बारामतीचे हस्तक असल्याचा शास्त्रींवर आरोब होतो. याबाबत शास्त्री यांनी मात्र मौन बाळगत काळच उत्तर देईल, असे स्पष्ट केले.

Web Title: namdev shatri,said,about,dasara,melewa,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.