शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नाहाटा यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST

श्रीगोंदा : श्रीगोंदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना शिवीगाळ व दमबाजी केल्या प्रकरणातील आरोपी श्रीगोंदा बाजार समितीचे ...

श्रीगोंदा : श्रीगोंदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना शिवीगाळ व दमबाजी केल्या प्रकरणातील आरोपी श्रीगोंदा बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, राजकीय दबावाखाली काळे यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, असा आरोप करीत नाहाटा यांनी पोलीस कोठडीतच उपोषण सुरू केले आहे.

बाळासाहेब नाहाटा यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून बाळासाहेब नाहाटांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी मंगळवारी सकाळी गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांची भेट घेऊन काळे यांना दिलासा दिला, तसेच या प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेतली.

श्रीगोंदा पंचायत समिती, तहसील कार्यालय, नगरपालिका कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले, तसेच गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना झालेल्या शिवीगाळ, दमबाजी प्रकरणाचा निषेध नोंदविला. नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले यांना निवेदन देण्यात आले.

...........

या प्रकरणाचा पर्दाफाश करणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पुढाऱ्याच्या सांगण्यावरून प्रशांत काळे यांनी माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला आहे. मी बाहेर आल्यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश करणार आहे, अशी माहिती बाळासाहेब नाहाटा यांना दिली.

आपण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आढावा बैठकीत वादळी भूमिका मांडली, याचा बदला घेण्यासाठी आपल्याला यात गुंतवले आहे.

मी कोरोना काळात जनतेला केलेली मदत काही नेत्यांच्या डोळ्यात खुपत आहे.

त्यांना स्वत: काही करायचे नाही आणि दुसऱ्याला काही करू द्यायचे नाही. नीच राजकारण करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. आपण पोलीस कोठडीत अन्न, पाणी, औषध काहीच घेणार नाही, असेही नाहाटा म्हणाले.

..........

२२ श्रीगोंदा कर्मचारी