नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 14:55 IST2020-10-09T14:53:46+5:302020-10-09T14:55:10+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, संपर्कात आलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

Nagar's District Superintendent of Police Manoj Patil coronated | नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील कोरोनाबाधित

नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील कोरोनाबाधित

अहमदनगर: जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, संपर्कात आलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. पाटील यांनी १ ऑक्टोबर रोजी यांनी नगरचा पदभार स्वीकारला आहे. पदभार स्विकारल्यानंतर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पाटील यांचे स्वागत केले होते. त्यामुळे संपर्कात आलेल्या नागरिकांनी काळजी घ्यावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे. दरम्यान जिल्हा पोलीस दलातील अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोना बाधित झाले होते. यातील बहुतांशी जणांनी कोरोनावर मात करत पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत.

Web Title: Nagar's District Superintendent of Police Manoj Patil coronated