नगरकरांचे पाणी एक हजार रुपयांनी महागले; स्थायी समितीच्या सभेत पाणीपट्टीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 13:43 IST2018-02-06T13:43:30+5:302018-02-06T13:43:53+5:30
अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी पाणीपट्टी एक हजार रुपयांनी वाढविण्यात आली असून, आता नगरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी २५०० रुपये मोजावे लागणार आहेत.

नगरकरांचे पाणी एक हजार रुपयांनी महागले; स्थायी समितीच्या सभेत पाणीपट्टीत वाढ
अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी पाणीपट्टी एक हजार रुपयांनी वाढविण्यात आली असून, आता नगरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी २५०० रुपये मोजावे लागणार आहेत.
मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाणी पट्टी वाढविण्यास सदस्यांनी विरोध केला. मात्र, पाणी योजनेचा ९५ टक्के खर्च वीज बील भरण्यातच जात असल्यामुळे पाणीपट्टीत वाढ करणे गरजेचे असल्याचे सांगत प्रशासनाने वाढीव पाणीपट्टीचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवला. स्थायी समितीच्या सभापती सुवर्णा जाधव यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली असून, आता हा प्रस्ताव महासभेपुढे मांडण्यात येणार आहे. पूर्वी १ हजार ५०० रुपये पाणी पट्टी होती. आता ही पाणी पट्टी २ हजार ५०० करण्यात आली आहे. नगर शहरात ५३ हजार ६०४ अधिकृत नळधारक आहेत. वाढीव पाणीपट्टीला महासभेत मंजुरी मिळाल्यास महापालिकेला वार्षिक १ कोटी ३४ लाख १० हजार रुपये महसूल मिळणार आहे. त्यामुळे पाणीपट्टीत वाढ आवश्यक असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे आहे. स्थायी समितीच्या सभेला बाबासाहेब वाकळे, दत्ता कावरे, संजय शेंडगे, उपायुक्त राजेंद्र चव्हाण, विक्रम दराडे आदी उपस्थित होते.