नगर-पुणे प्रवास १२६ वरून १५० : एसटीची अठरा टक्के भाडेवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 17:48 IST2018-06-16T17:47:45+5:302018-06-16T17:48:26+5:30
आजपासून एसटी महामंडळाने तब्बल १८ टक्के भाडेवाढ केल्याने नगर-पुणे प्रवास २४ रूपयांनी महागला आहे. आता साध्या गाडीने पुण्याला जाण्यासाठी १२६ऐवजी थेट १५० रूपये मोजावे लागणार आहेत.

नगर-पुणे प्रवास १२६ वरून १५० : एसटीची अठरा टक्के भाडेवाढ
अहमदनगर : आजपासून एसटी महामंडळाने तब्बल १८ टक्के भाडेवाढ केल्याने नगर-पुणे प्रवास २४ रूपयांनी महागला आहे. आता साध्या गाडीने पुण्याला जाण्यासाठी १२६ऐवजी थेट १५० रूपये मोजावे लागणार आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घोषित केलेली १८ टक्के भाडेवाढ शुक्रवारी (१५ जून) मध्यरात्रीपासून लागू झाली आहे. डिझेलचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनकरारामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात वाढ झाली आहे. सुट्ट्या पैशांचा वाद मिटविण्यासाठी एसटी महामंडळाने पाचच्या पटीत तिकीट आकारण्याच्या निर्णय घेतला आहे. परिणामी ७ रुपयांच्या तिकिटांसाठी ५ रुपये आणि ८ रुपयांच्या तिकिटांसाठी १० रुपये आकारण्यात येणार आहेत. या भाडेवाढीमुळे नगर, औरंगाबाद प्रवास २४ रूपये, तर मुुंबईसाठी ५५ रूपये जादा द्यावे लागणार आहेत.