नगर मनपा निवडणूक २०१८ : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 16:13 IST2018-11-10T16:12:41+5:302018-11-10T16:13:23+5:30
अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली होती.

नगर मनपा निवडणूक २०१८ : शिवसेनेची दुसरी यादी जाहीर
अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली होती. त्यानंतर आज पुन्हा दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये १३ जणांना सेनेने उमेदवारी दिली आहे.
गुरुवारी सेनेने १९ जणांना उमेदवारी जाहीर केली होती. दुस-या यादीमध्ये १३ जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये जुन्याच चेह-यांना संधी देण्यात आली आहे. दुस-या यादीमध्ये प्रभाग १ मधून डॉ.चंद्रकांत बारस्कर, प्रभाग २ मधून प्रियंका रघुनाथ तवले, प्रभाग ६ मधून रवींद्र विलास वाकळे, प्रभाग क्रमांक ७ मधून रिता शैलेश भाकरे, अक्षय कातोरे, प्रभाग आठमधून सचिन शिंदे, शाम नळकांडे, प्रभाग १२ मधून मंगल लोखंडे, प्रभाग १३ मध्ये संगीता बोज्जा, सुवर्णा गेन्नापा, प्रभाग १४ मध्ये सुरेखा भोसले, रेखा भंडारी आणि प्रभाग १५ मधून परसराम गायकवाड यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेना सर्व जागेवर उमेदवार उभे करणार : अनिल राठोड
निवडणुकिला कमी दिवस राहीलेत. त्यामुळे सेनेने आघाडी घेतलीय. तिसरी यादीही लवकरच करणार आहोत. सर्व जागी शिवसेना उमेदवार देणार आहे. महापालिकेत आम्ही नक्कीच बहुमत मिळवू. युतीसाठी चर्चा सुरू आहे. आम्ही युतीसाठी सकारात्मक आहोत. युतीसाठी वरच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. पक्षप्रमुख जे आदेश देतील तसे आम्ही काम करणार आहोत. युती झाली तर जाहीर केलेल्या यादीत अजिबात बदल होणार नाही, असे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी दक्षिण जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते उपस्थित होते.