शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नगर जिल्ह्यात जनावरांनी खाल्ला ३१७ कोटीचा चारा, गैरव्यवहार झाल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 06:46 IST

चारा-छावण्या, टँकर व जलयुक्त शिवारच्या कामांत गैरव्यवहार झाल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केल्यापासून हे तिन्ही विभाग चांगलेच चर्चेत आले आहेत.

- चंद्रकांत शेळकेअहमदनगर : चारा-छावण्या, टँकर व जलयुक्त शिवारच्या कामांत गैरव्यवहार झाल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केल्यापासून हे तिन्ही विभाग चांगलेच चर्चेत आले आहेत. जिल्ह्यातील चारा छावण्यांसाठी शासनाने ३१७ कोटी रूपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले असून त्यातील २७६ कोटी रूपये छावणीचालकांच्या खात्यावर वर्ग झाले आहेत.पावसाअभावी मागील वर्षी जिल्ह्यात पाणी व चाराटंचाई निर्माण झाल्याने शासनाने फेब्रुवारी २०१९पासून जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागवले. सुरूवातीलाच या छावणीचालकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. तत्कालीन सत्ताधारी आमदारांची शिफारस व पालकमंत्र्यांची संमती या छावण्यांसाठी लागत असल्याने एकाच पक्षाच्या कार्यकर्त्यांना या छावण्या दिल्या गेल्या असा आरोप प्रारंभी अनेकांनी केला. छावण्या सुरू झाल्यानंतर जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. मे, जून या महिन्यांत छावण्यांचा आकडा पाचशेच्या पार झाला. ९ तालुक्यांतील ५0४ छावण्यांत ३ लाख ३६ हजार जनावरे दाखल होती.जूनअखेर पावसाने हजेरी लावल्यानंतर काही भागांतील छावण्या हळूहळू कमी होऊ लागल्या. तरीही २३ आॅक्टोबरपर्यंत छावण्या सुरू होत्या. या नऊ महिन्यांत छावण्यांसाठी ३१७ कोटी रूपये शासनाने जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केले. छावणी चालकांनी बिले सादर केल्यानंतर त्यातील २७६ कोटी रूपये छावणी चालकांच्या खात्यावर वर्ग झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. उर्वरित निधी अद्याप वाटप झालेला नाही. तपासणीत जिल्हा प्रशासनाने काही छावणी चालकांवर दंडात्मक कारवाईही केली.छावण्या मंजूर करतानाच्या अटी-शर्ती, मंजूर छावण्यांतील जनावरे, तसेच त्यांना दिला गेलेला चारा अशा अनेक विषयांवर आमदार रोहित पवार यांनी छावण्यांच्या चौकशीची मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही त्याची तत्काळ दखल घेत चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtraमहाराष्ट्र