स्वत:च निवडणार माझा जोडीदार; लग्नाच्या प्रश्नावर अदिती तटकरे यांचे बेधडक उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 16:05 IST2020-01-17T16:04:20+5:302020-01-17T16:05:14+5:30
आदित्य ठाकरे यांच्या लग्नाचा विषय त्यांच्या आईकडे सोपविला गेला आहे. मी मात्र, माझा जोडीदार स्वत:च निवडणार असल्याचे बेधडक उत्तर उद्योग व खाण राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी दिले.

स्वत:च निवडणार माझा जोडीदार; लग्नाच्या प्रश्नावर अदिती तटकरे यांचे बेधडक उत्तर
संगमनेर : आदित्य ठाकरे यांच्या लग्नाचा विषय त्यांच्या आईकडे सोपविला गेला आहे. मी मात्र, माझा जोडीदार स्वत:च निवडणार असल्याचे बेधडक उत्तर उद्योग व खाण राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी दिले.
कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे चिरंजीव राजवर्धन यांच्या कल्पनेतून साकारलेल्या मेधा-२०२० युवा सांस्कृतिक महोत्सवात गायक अवधूत गुप्ते यांच्या प्रश्नांना राज्यमंत्री तटकरे यांनी उत्तरे दिली. संगमनेरातील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेत संवाद तरुणाईशी हा कार्यक्रम पार पडला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, आमदार झिशान सिद्दीकी, आमदार धीरज देशमुख, आमदार ऋतुराज पाटील यावेळी उपस्थित होते.
या तरूण आमदारांमध्ये पर्यावरण मंत्री ठाकरे, आमदार सिद्दीकी व मंत्री तटकरे या अविवाहितांना त्यांच्या लग्नाच्या विषयावर छेडण्यात आले. या काहिशा कठीण प्रश्नांना मंत्री अदिती यांनी निर्भिडपणे उत्तरे दिली. पर्यावरण मंत्री आदित्य हे त्यांचा जोडीदार स्वत: निवडणार नाही. परंतु माझा जोडीदार मी स्वत:च निवडणार आहे. असेही त्या म्हणाल्या.