कंटेनरखाली चिरडून माय-लेकाचा मृत्यू

By Admin | Updated: July 13, 2016 00:36 IST2016-07-13T00:11:27+5:302016-07-13T00:36:23+5:30

कोल्हार/राहुरी : कंटेनरच्या पुढच्या चाकाखाली सापडून मायलेक ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी नगर-मनमाड महामार्गावर कोल्हारजवळील प्रवरा नदी पुलाच्या उतारावर घडली.

My-Lek's death crumbled under the container | कंटेनरखाली चिरडून माय-लेकाचा मृत्यू

कंटेनरखाली चिरडून माय-लेकाचा मृत्यू


कोल्हार/राहुरी : कंटेनरच्या पुढच्या चाकाखाली सापडून मायलेक ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी नगर-मनमाड महामार्गावर कोल्हारजवळील प्रवरा नदी पुलाच्या उतारावर घडली.
मंगल भाऊसाहेब जपे (वय ६६) व त्यांचा मुलगा विजय भाऊसाहेब जपे (वय ३५, रा. निमगाव घाणा, ता. नगर) अशी मृतांची नावे आहेत. जपे मायलेक मंगळवारी दुपारी एका कार्यक्रमाहून परतत असताना त्यांच्या मोटारसायकलला हा अपघात झाला. कोल्हार (ता. राहाता) जवळील प्रवरा नदी पूल ओलांडून जपे मायलेक पुढे नगरच्या दिशेने निघाले असता पाठीमागून येत असलेल्या कंटेनरने (एम.एल. ०१, एस. ९११७) त्यांच्या मोटारसायकलला (एम.एच. १६, ७५६७) धडक दिली. त्यामुळे हे दोघेही मोटारसायकलसह कंटेनरच्या चाकाखाली चिरडले गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पुलाच्या उतारावर हा अपघात झाल्याने कंटेनरने बरेच लांब मोटारसायकलला फरफटत नेले. राहुरी पोलिसांनी घटनास्थळी येत दोन्ही मृतदेह बाहेर काढले. त्यासाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळू घोडे यांना स्थानिक ग्रामस्थ संजय शिरसाठ, अण्णा शिरसाठ, राजेंद्र भोसले यांनी मदत केली. अपघातामुळे पोलिसांनी नगरकडे होणारी वाहतूक जुन्या समांतर पुलावरून वळवली होती. राहुरी पोलिसांनी कंटेनरचालकास ताब्यात घेतले आहे. (वार्ताहर)

Web Title: My-Lek's death crumbled under the container