नेवाशातील प्रत्येक गावात ‘माझी जमीन, माझं जंगल’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:20 IST2021-03-15T04:20:04+5:302021-03-15T04:20:04+5:30
नेवासा : तालुक्यातील प्रत्येक गावात ‘माझी जमीन, माझं जंगल’ अभियान राबविण्यात येणार आहे. ‘अकिरा मियावकी’ पद्धतीचे जंगल उभारण्यासाठी ‘पैस ...

नेवाशातील प्रत्येक गावात ‘माझी जमीन, माझं जंगल’ अभियान
नेवासा : तालुक्यातील प्रत्येक गावात ‘माझी जमीन, माझं जंगल’ अभियान राबविण्यात येणार आहे. ‘अकिरा मियावकी’ पद्धतीचे जंगल उभारण्यासाठी ‘पैस सामाजिक प्रतिष्ठान’ पुढाकार घेणार आहे.
याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे संचालक प्रकाश सोनटक्के, अभिजीत मापारी, सतीश मुळे, पत्रकार गुरुप्रसाद देशपांडे, सचिन गव्हाणे, अरविंद जपे, रणछोड जाधव, संदीप आलवणे उपस्थित होते.
पर्जन्यमान कमी असणाऱ्या परिसरात जपानी वनसंशोधक अकिरा मियावाकी यांच्या जंगल निर्मितीच्या पद्धतीनुसार वृक्षारोपण केल्यास पहिली दोनच वर्षे पाण्याची व्यवस्था करावी लागते. या दोन वर्षांतच झाडे आठ ते दहा फूट उंच वाढतात. साधारण आठ ते दहा वर्षांमध्ये पूर्ण क्षमतेने नैसर्गिक जंगल तयार होते. दोन झाडांमध्ये २ ते ३ फूट अंतर असते. १ गुंठ्यामध्ये (१००० चौ. फूट) साधारण २२५ ते २५० रोपे लावली जातात.