मविआने सातत्याने देशाच्या स्वातंत्र्यावीरांचा अवमान केला - सुजय विखे

By सुदाम देशमुख | Updated: April 8, 2023 13:57 IST2023-04-08T13:56:29+5:302023-04-08T13:57:48+5:30

नगर शहरात शनिवारी भाजपा आणि शिवसेनेच्या वतीने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या निमित्ताने ते बोलत होते.

MVA consistently insulted the country's freedom fighters - Sujay Vikhe | मविआने सातत्याने देशाच्या स्वातंत्र्यावीरांचा अवमान केला - सुजय विखे

मविआने सातत्याने देशाच्या स्वातंत्र्यावीरांचा अवमान केला - सुजय विखे

अहमदनगर : महाविकास आघाडी सरकार कडून सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला जातोय आणि अशा वेळी त्यांच्या मांडीला मांडी  लावून माजी मुख्यमंत्री बसत आहेत.  याची चीड सर्वत्र निर्माण होत असून जनतेच्या मनात याबद्दल आक्रोश आहे. या यात्रेच्या निमित्ताने त्याला समर्पक उत्तर देत असून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यार्‍या सैनिकाबद्दलची किती खालच्या पातळीवर विरोधकांची विचारसारणी आहे. हे यातून दिसत असल्याचे खा. डॉ. सुजय विखे यांनी संगितले. 

नगर शहरात शनिवारी भाजपा आणि शिवसेनेच्या वतीने आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस यांचे जेष्ठ नेते हे सातत्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या स्वातंत्र्य सैनिका बद्दल अवमानास्पद वक्तव्य करत आहेत. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे माजी मुख्यमंत्री हे त्यांच्या मांडीला मांडी लावून वज्रमुठ सभा घेत आहेत. त्यामुळं त्यांचं बेगडी हिंदुत्व हे सर्वसामान्यांना कळलं असून भाजप आणि शिवसेना हेच हिंदुत्वाचे कडवे रक्षक आहेत. या गौरव यात्रेतून सावरकर यांच्या त्याग आणि निष्ठेची अनुभूती सर्वांना करून देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी या प्रसंगी संगितले. 

यावेळी चौपाटी कारंजा चौक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या गौरव यात्रेत भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष महेंद्र गंधे, अभय काका आगरकर,वसंतराव लोढा, सुवेंद्र गांधी, दिलीप सातपुते, अनिल शिंदे, बाबूशेट टायरवाले, माजी महापौर बाबासाहेब वाकले, धनंजय जाधव ,   सुरेखा विदये, शशांक कुलकर्णी, नरेंद्र कुलकर्णी, महेश नामदे, विवेक नाईक, बाबासाहेब गायकवाड आणि महिला पदाधिकारी  मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

Web Title: MVA consistently insulted the country's freedom fighters - Sujay Vikhe