ज्ञानेश्वर कारखान्याच्या दोन ट्रक साखरेची परस्पर विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST2021-07-22T04:14:57+5:302021-07-22T04:14:57+5:30

भेंडा : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना येथून उचललेल्या २७० क्विंटल साखरेची परस्पर विल्हेवाट लावून ९ ...

Mutual sale of two trucks of sugar from Dnyaneshwar factory | ज्ञानेश्वर कारखान्याच्या दोन ट्रक साखरेची परस्पर विक्री

ज्ञानेश्वर कारखान्याच्या दोन ट्रक साखरेची परस्पर विक्री

भेंडा : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना येथून उचललेल्या २७० क्विंटल साखरेची परस्पर विल्हेवाट लावून ९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एक जणाविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मनोज मानुधने (रा. एरंडोल, जि. जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मंजूश्री महेश करवा (रा. फलटण, जि. सातारा) यांची गणपती एन्टरप्रायजेस नावाची फर्म आहे. त्यांनी फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. करवा या त्यांच्या पती समवेत साखर कारखान्यांकडून साखर विकत घेऊन मागणीनुसार व्यापाऱ्यांना साखर पुरवठा करतात. एप्रिल २०२० मध्ये या व्यवसायातून मनोज मानुधने यांच्याशी ओळख झाली. त्यांच्यामार्फत प्रकाशचंद ओसवाल (रा. जामनेर, जि. जळगाव) यांना वेळोवळी साखर पाठविली. यामुळे मनोज मानुधने यांनी विश्वास संपादन केल्याने ज्ञानेश्वर कारखाना येथून १० जून रोजी (ट्रक क्र. एमएच १९ जे ३९८६) मधून १२० क्विंटल व १२ जून रोजी (ट्रक क्र. एमएच २० ए १९५२) मधून १५० क्विंटल साखर मानुधनेमार्फत प्रकाशचंद ओसवाल जामनेर यांना दोन ट्रकमधून पाठविली. साखरेचे पैसे नेहमी १० दिवसात जमा होतात. पैसे जमा न झाल्याने ओसवाल यांना फोन केला. त्यावेळी त्यांनी सांगितले की आपल्याकडील कोणत्याही साखरेच्या ट्रक माझ्याकडे खाली झालेल्या नाहीत. ओसवाल यांनी मानुधने यांनाही फोनवर घेतले. त्यावेळी मानुधने यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचवेळी आपली फसवणूक झाल्याचे करवा यांच्या लक्षात आले. करवा यांनी आपल्या नातेवाइकाला घेऊन एरंडोल गाठले. मानुधने यांच्याकडे पैशाची मागणी केली असता. त्यांनी माझ्याकडे पैसे नाहीत काय करायचे करा, असे म्हणत शिवीगाळ करून धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून मनोज मानुधने व दोन ट्रक चालकांच्या विरोधात साखरेची परस्पर विल्हेवाट लावून ८ लाख ९५ हजार ७७९ रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Mutual sale of two trucks of sugar from Dnyaneshwar factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.