मुस्लिम बांधव ठरले ७५ कुटुंबांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST2021-06-02T04:17:30+5:302021-06-02T04:17:30+5:30
गहू, तांदूळ, शेंगदाणे, साखर, गोडेतेल, चहा पावडर इत्यादी किराणा साहित्याचे किट शेख यांनी गरीब कुटुंबीयांना वाटप केले. यावेळी उद्योजक ...

मुस्लिम बांधव ठरले ७५ कुटुंबांचा आधार
गहू, तांदूळ, शेंगदाणे, साखर, गोडेतेल, चहा पावडर इत्यादी किराणा साहित्याचे किट शेख यांनी गरीब कुटुंबीयांना वाटप केले. यावेळी उद्योजक गणेश हराळ, संतोष सकट, रामकृष्ण कुताळ आदी उपस्थित होते. लॉकडाऊनच्या संकट काळात मुस्लिम बांधवांनी गोरगरिबांच्या मदतीसाठी जात-धर्म विसरून माणुसकीचा धर्म जोपासला. कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या कष्टकरी, मजूर, गोरगरिबांची उपासमार होऊ नये यासाठी दानशूर मुस्लिम बांधवांनी किराणा साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. तसेच गावात अब्बास शेख यांनी आपला मुलगा देशासाठी शहीद झाल्यानंतर शहीद मेजर फिरोज शेख यांच्या स्मरणार्थ गावासाठी २४ तास पिण्याच्या पाण्याची सोय आपल्या मशिदीच्या मार्फत करून हिंदू-मुस्लिम ऐक्य जोपासण्याचे काम केले आहे. गुंडेगावच्या सरपंच मंगल सकट व उपसरपंच संतोष भापकर, माजी सैनिकांची त्रिदल सेवा संघटनेचे पदाधिकारी श्यामराव कासार, मेजर भवानीप्रसाद चुंबळकर, मेजर राहुल चौधरी यांनी मेजर आब्बास शेख यांच्या कामाचे कौतुक केले.
010621\img-20210601-wa0228.jpg
गुंडेगाव फोटो