डोक्यात दगड घालून तरुणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 12:57 IST2021-03-17T12:57:36+5:302021-03-17T12:57:42+5:30
राहाता तालुक्यातील लोणीमध्ये इरिगेशन कॅनॉलच्या परिसरात कच्चा रोडवर मंगळवारी (दि.१६) रात्री ८ वाजेदरम्यान अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला.

डोक्यात दगड घालून तरुणाचा खून
लोणी : राहाता तालुक्यातील लोणीमध्ये इरिगेशन कॅनॉलच्या परिसरात कच्चा रोडवर मंगळवारी (दि.१६) रात्री ८ वाजेदरम्यान अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची लोणी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली असता हा मृतदेह अर्जुन अनिल पवार (वय २५, रा बारागाव नांदूर ता.राहुरी) याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. डोक्यात दगड घालून पवार याचा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितलं.
या प्रकरणात पोलिसांनी अर्जुन पवार याचे मित्र दीपक डोळस व विठ्ठल कावळे यांना ताब्यात घेतले आहे. दोघा आरोपींनी अर्जुन पवार याच्या डोक्यात दगड घालून केला असून खून करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. संबंधित आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास लोणी पोलिस स्टेशनचे समाधान पाटील करत आहेत .